Blogger Template by Blogcrowds.

कळ्यांना जागवूनी बोलले दव

"उरे दो-चार घटकांचेच शैशव"प्रिये, तोरा गुलाबाचा असावा


नि मोहाच्या फुलांचे धुंद आसवअता उमलावयाची वेळ झाली


सख्याचे नादती बागेत पदरवमधाचे बोट आता खूप झाले


उधाणू दे मधाचा मत्त अर्णवदवाचा स्पर्श अन्‌ चुंबन अलीचे


कळी खुलते नि घडतो संगमोत्सवधुक्याच्या चादरीने फूल झाकी


जणू उन्मीलितेचे तृप्त सौष्ठवजराही ना दुखवता फूल खुडणे


असे याहून काही हस्तलाघव ?किती, 'भृंगा', तुझी, रे, दांडगाई


अशा वेळी हवे रेशीम मार्दव
...

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home