Blogger Template by Blogcrowds

मना, सांप्रती क्लृप्तिपंथेचि जावे

जरा धूर्त, पाताळयंत्री असावे



चतुर ती, सुखी ती जिला नीट ठावे


कधी खेळ व्हावे, कधी खेळवावे



विनवण्या करू लागता तुष्ट व्हावे


(परी हट्ट आधीच पुरवून घ्यावे!)



तमा ना कुणाला पदी वाहिल्यांची


गळा माळ व्हावे, उशाशी फुलावे



असे पेटलेली सदोदीत वस्ती


इथे पावलोपावली आगलावे



किती काळ कज्जेदलाली करावी


किती चालवावे पिढीजात दावे

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home