Blogger Template by Blogcrowds.

प्रेरणे, देऊ तुला चावी कशी ?

पूर्णता कवितेस लाभावी कशी ?स्वच्छ कागद गाठतो शत्रूपरी


अक्षरांची खिंड लढवावी कशी ?वादळी लाटांप्रमाणे कल्पना


शब्दनौका त्यात हाकावी कशी ?काय वांझोट्या विचारांचे करू ?


लेखणीची कूस उजवावी कशी ?नांगरूही वाळवंटाला अम्ही


अमृताची धार वर्षावी कशी ?आतला लेखक कधीचा संपला


शारदेची अर्चना व्हावी कशी ?मूक हो अन्‌ वैखरीला दे रजा


हाक कानी त्याविना यावी कशी ?

1 Comment:

  1. क्रान्ति said...
    khaas! gazal aavadali.

Post a CommentNewer Post Older Post Home