Blogger Template by Blogcrowds.

माणसे

खूप पाहिली वेदशास्त्रसंपन्न माणसे

धर्म पांघरुन माणसांस सापत्न माणसेशास्त्रशुद्ध उच्चार मागतो देव कोणता ?

थाप मारती तीर्थक्षेत्रसंलग्न माणसेदेव काय नैवेद्य मागतो सोवळ्यातला ?

खरकट्यातुनी वेचती इथे अन्न माणसेराउळास आकार येत पाथरवटांमुळे

देवरूप साकारतात प्रच्छन्न माणसेहार मानुनी अंत, पार शोधून शेवटी

"नेति, नेति" उद्गारतात व्युत्पन्न माणसे 

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home