Blogger Template by Blogcrowds.

मरण


काही झिजून मेले, काही मढून मेले

बहुसंख्य मात्र येथे केवळ जगून मेलेदे, कायद्या, पुरावा काही जिवंततेचा

चिखलात तारखांच्या लाखो रुतून मेलेरात्री ऋतू-ऋतूने बर्फाळ होत गेल्या

ज्योती, पतंग दोघे मग गारठून मेलेकौतुक करा फुलाच्या ह्या एकनिष्ठतेचे

जे एकदाच फुलले अन्‌ मोहरून मेलेसरणावरी मुमुक्षू वैतागुनी म्हणाला

"यंदाहि फक्त विटके कपडे जळून मेले"

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home