Blogger Template by Blogcrowds.

उगा का स्वत:ला सजवले असावे ? 

तिला प्रेम माझे उमजले असावे असे गंध हा कस्तुरी भावनांचा 


उराशी तिने पत्र धरले असावे अचानक नकारातला जोर सरला 


कुणी नाव माझे सुचवले असावे सहज गाजवू लागली हक्क तेव्हा


मनाने तुला खास वरले असावेकधी ती अबोली, कधी रातराणी


फुलांनीच नखरे शिकवले असावे 


 
अशी ऐन रंगात का लाजली ती ? 


दिवे चांदण्यांचे उजळले असावे...

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home