Blogger Template by Blogcrowds.

शोध

थकल्यावरती सहज शिराया कूस शोधतो आहे

एकाकी चालुन थकलो, जूलूस शोधतो आहेगर्दी भाडोत्री मिळते, जयघोष टेप केलेला

सुखसोयींनी युक्त असा मी क्रूस शोधतो आहेआयुष्याच्या प्रखर उन्हाने रोज काहिली होते

आभासी का होईना, पाऊस शोधतो आहेप्रेयस, श्रेयस, राजस, तामस -  रूप कोणते घ्यावे ?

ज्यात स्वत:ला ओतावे ती मूस शोधतो आहेमुलगा, भाऊ, नवरा, बाबा, सर्व लेबलांखाली

घुसमटलेला, दडलेला माणूस शोधतो आहे

1 Comment:

Post a CommentNewer Post Older Post Home