Blogger Template by Blogcrowds.

शो-रूम

जातो तिथे कपाटे उघडून पाहतो मी

ग्रंथांविना घराला शो-रूम मानतो मीवाटेत माणसाचे माणूसपण हरवले

उत्क्रांतवाद कोठे चुकला, तपासतो मीबांधून ठेवणारे विरलेत सर्व धागे

तुटलेपणा मनांचा शब्दात ओवतो मीशिकलो नव्या जगाचे रीती-रिवाज मीही

सोयीनुसार जवळी येतो, दुरावतो मीहिंदूपणास जपतो, मी संस्कृतीस जपतो

(तोरण सणासुदीला दारास लावतो मी!)वरदान शारदेचे, की शाप हे कळेना

हरपून भान कागद दिन-रात नासतो मी

1 Comment:

Post a CommentNewer Post Older Post Home