ते कुणाचे शब्द होते? ते कुणाचे सूर होते?
अंतरी वस्तीस होते, अन् तरीही दूर होते
हे कसे वात्सल्य ज्याचा कोरडा असतो उमाळा?
राहिले पान्हावण्याचे ते अभागी ऊर होते
मी प्रवाहाच्या बरोबर वाहण्याचे काम केले
पैलतीरी पोचण्याइतके कुठे मगदूर होते?
लक्ष योनींचा पसारा, ह्या फुकाच्या येरझारा
जन्म-मरणाचीच चिंता, मोक्ष मिळणे दूर होते
’भृंग’, नाभीकमळ शोधू , ती मिठी असते चिरंतन
बाप, आई, मित्र, पत्नी; सर्व क्षणभंगूर होते...
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
2 Comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)
भन्नाट लिहता राव तुम्ही... अगदी इथे इथे भिडते... ( हदयावर बोट ठेवून)..
आपल्या साऱ्याच कविता अगदी वास्तववादी वाटतात. जगण्यासाठीच इतकी धडपड, मारामाऱ्या, कराव्यालागताहेत की मोक्ष, स्वर्गप्राप्ती असल्या गोष्टींचा विचारही करायला उसंत नाहि...क्षणभंगुर असले तरी जीवन-मरनाच्या गर्तेत तुम्ही आणि मीही अडकलोय.
पाचोळा.