Blogger Template by Blogcrowds.

मोहाची फुले, मोहाचे घोट
जीवनात ओतप्रोत

पण आम्ही
हुंगणार नाही, पिणार नाही
मचूळ पाण्याशिवाय काही

कारण आम्हाला मिळाले आहेत
नेभळट, पांढरपेशे संस्कार; अन्
"साधी राहणी,उच्च विचारसरणी" सारख्या सुभाषितांची अफू

तिचे व्यसन जडले की मागून येतात
"अंथरूण पाहून पाय पसरावे",
"बिकट वाट वहिवाट नसावी"
ह्या तिच्या बहिणी

ज्यांनी नासवल्या मध्यमवर्गियांच्या कित्येक पिढ्या
"समाजाची  धुरा तुमच्यावर आहे" ही लोणकढी ठोकून

जगण्याच्या आनंदास पाप ठरवले
आणि दारिद्र्यास लावल्या उदात्ततेच्या  झालरी

नीतिमत्तेच्या आनुवंशिक क्षयरोगाला कवटाळून बसतो आम्ही
छोट्या छोट्या लबाड्या करतानाही
(कारण दरोडा घालण्याची हिंमत नाही)

अजून किती काळ बसणार आहोत कुरतडत
न झेपणार्‍या नैतिकतेचे पाश,
त्यांचेच गोडवे गात ?

1 Comment:

  1. साळसूद पाचोळा said...
    गंजारव..

    मस्तच राव ... कडवट आहे पन सत्य आहे.

    पाचोळा.

Post a Comment



Newer Post Older Post Home