Blogger Template by Blogcrowds.

तृषा

खोलवर सार्‍या मनांच्या गाडली आहे तृषा

मात्र वसने सोवळ्याची नेसली आहे तृषा 'लोककल्याणार्थ' काया झिजवणारे पाहिले

त्याच गरजा 'सज्जनांच्या', 'त्यातली' आहे तृषाहो, दिला फेसाळ प्याला, मात्र डोळे चुकविले

हाय, साकीने न माझी जाणली आहे तृषा उष्ण श्वासांनी कुणाच्या पेटवावी पुनरपी

थंड नजरेने तुझ्या जी गोठली आहे तृषा ? काल मधुशालेत बसलो पंडितासोबत जरा

लागली परमेश्वराची; बाटली आहे तृषावैष्णवाला नेत आहे आज मधुशालेत मी

त्यासही सोमेश्वराची लागली आहे तृषाकुंकवाचा घ्या करंडा अन्‌ भरा मळवट तिचा

साथ ती आजन्म देते, सावली आहे तृषा जीवनाच्या दोन घोटांहून नव्हते मागणे

लीलया त्यांच्यातही सामावली आहे तृषावारुणी मी जीवनाची आणली होती किती ?

संपली ती, संपलो मी, संपली आहे तृषाद्याल अग्नी मज जिथे, बांधा तिथे मंदिर तिचे

माझियासंगे सती ही चालली आहे तृषा

1 Comment:

Post a CommentNewer Post Older Post Home