Blogger Template by Blogcrowds.

कोंडलेले सांगण्याला राहिले आयुष्य कोठे ?
काळजाला पिंजण्याला राहिले आयुष्य कोठे ?

सापडाया लागलो आता कुठे माझा मला मी
जीवना, तुज शोधण्याला राहिले आयुष्य कोठे ?

वांझ शिक्षणशिंपल्य़ांची उपसली शालेय डबकी
मौक्तिकांना वेचण्याला राहिले आयुष्य कोठे ?

नाथ, नाम्या, माउली अन्‍ देहुचा नादार वाणी
शेष काही वाचण्याला राहिले आयुष्य कोठे ?

साधण्या संवाद पडला माणसांशी जन्म अपुरा
चिद्‍घनाशी बोलण्याला राहिले आयुष्य कोठे ?

1 Comment:

  1. Anonymous said...
    जबरदस्त गझल! दुसरे कडवे विशेष आवडले. अनुदिनीची सजावट सुंदर झाली आहे.

Post a Comment



Newer Post Older Post Home