Blogger Template by Blogcrowds.

एक अक्षरावर आकांत कशास?
बोल, रामशास्त्र्या, देहान्त कशास?

ही जरा तनुची, तारुण्य मनात
ही अशी अघोरी संक्रांत कशास?

एकही न उरला जळण्यास पतंग
वांछिलास, ज्योती, एकांत कशास?

माणसे न कोणी, रेडेच समोर
माउली वदावे वेदांत कशास?

विश्वरूप रुचले ज्याला न 'मिलिंद'
आंधळ्यास असल्या दृष्टांत कशास?

3 Comments:

  1. Nandan said...
    मिलिंद, गझल छान आहे. खासकरुन शेवटचे दोन शेर आवडले. फक्त पहिल्या शेरातील एका अक्षराचा संदर्भ नीट कळला नाही. त्याबद्दल अधिक लिहू शकशील का? धन्यवाद.
    Milind Phanse said...
    @ नंदन : आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार.
    'एक अक्षरा'चा संदर्भ - आनंदीबाईंची 'ध' चा 'मा' करण्याची कृती.
    Gayatri said...
    खूब! मीटर किती वेगळं आहे!
    अं...
    बात अक्षराची नाहीच रघोबा
    विधवेस बोल जा -"आकांत कशास?"

    छे! अपने बस की बात नहीं :)

    ज्योतीचा, 'दृष्टांता'चा शेर खूप आवडला.

Post a Comment



Newer Post Older Post Home