Posted by
Milind Phanse
at
Monday, October 30, 2006
बोचणारे का असे उपदेश देता ?
मी सुखी आहे, कशाला क्लेश देता ?
यौवनाला वस्त्र शोभे सप्तरंगी
पांढरे त्याला कसे गणवेश देता ?
भोगण्याला राहिले आयुष्य थोडे
अन् विरक्तीचा अता संदेश देता !
जीवनी विषयात होतो रंगलेलो
का मढ्याला व्यर्थ भगवा वेष देता ?
नेमले मध्यस्त देवाने न तुम्हा
का तुम्ही त्याचे मला आदेश देता ?
चोखयाचा अन् जनीचा देव माझा
काय दगडांचे मला अवशेष देता ?
मी सुखी आहे, कशाला क्लेश देता ?
यौवनाला वस्त्र शोभे सप्तरंगी
पांढरे त्याला कसे गणवेश देता ?
भोगण्याला राहिले आयुष्य थोडे
अन् विरक्तीचा अता संदेश देता !
जीवनी विषयात होतो रंगलेलो
का मढ्याला व्यर्थ भगवा वेष देता ?
नेमले मध्यस्त देवाने न तुम्हा
का तुम्ही त्याचे मला आदेश देता ?
चोखयाचा अन् जनीचा देव माझा
काय दगडांचे मला अवशेष देता ?
Labels: गझल
4 Comments:
-
- Gabbar said...
31/10/06 6:02 pmसही. फ़ारच पटण्यासारखं आहे बुवा.- jeevan jidnyaasaa said...
31/10/06 8:13 pmvesH anee desh asa vegaLaa sh asaNaare kaphiya chalatat kaa?- Milind Phanse said...
1/11/06 9:48 pmThis comment has been removed by the author.- Milind Phanse said...
30/11/06 2:13 pm@ जीवन जिद्न्यासा : जाणकारांकडे चौकशी केली - चालतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)