Blogger Template by Blogcrowds.

पाश





थोडे दर्भ अन् काही लाकडं धुमसणारी
काळ्या विहंगाची वाट पाहत चुळबुळणारे काही चातक
हळूच चोरट्या नजरेने घड्याळ पाहणारे
आहेत जिथे डोळ्यात आसवं तीही
'आता माझं कसं होणार' या विवंचनेची
बाकीच्या नजरांतून डोकावताहेत
हिशेब उद्याच्या वाटण्यांचे
अन् धाकधूक मृत्युपत्राची
स्थितप्रज्ञाच्या अलिप्ततेने चाललेले मंत्रोच्चारण
पोपटाच्या डोळ्याच्या जागी आकडा दक्षिणेचा
दक्षिणेश्वरा,या साऱ्यात उगाच शोधत होतो
एखादा अश्रू दुःखाचा
ज्याची आठवण पुरली असती अज्ञाताच्या प्रवासाला
तोच एक पाश, एक मोह होता शेवटचा
आता मी मुक्त आहे
कावळ्यांनो, पंगत वाढली आहे - लाजू नका

4 Comments:

  1. Gayatri said...
    !!!
    Anonymous said...
    kavita(?) kaLali nahi....chitra chhaan ahe.
    Anonymous said...
    correction--- chitra neeT baghitala ... nahi avaDla.
    Milind Phanse said...
    @ गायत्री : आपली प्रतिक्रिया कळली नाही. Is it a bouquet or a brickbat?असो, अनुल्लेखाने न मारल्याबद्दल आभार.

    @ R : कविता तशी अत्यंत साधी आणि सरधोपट आहे. माणसाच्या मृत्यूनंतर ९९ % वेळा स्मशानात दिसणारे द्दृश्य व तिथे घोटाळणाऱ्या त्याच्या आत्म्याची घालमेल चित्रित करण्याच्या प्रयत्न आहे.
    तसेच सोबतच्या छायाचित्राकडे मरणाबद्दलचा ठराविक 'अशुभ घटना' हा विचार बाजूला ठेवून एक चित्र म्हणून बघ, एक प्रवास म्हणून बघ. "वासांसि जीर्णानी यथा विहाय..."

Post a Comment



Newer Post Older Post Home