Blogger Template by Blogcrowds.

रणधुमाळी तीच अन्‌‍ त्याच आरोळ्या पुन्हा

ठाकल्या समरांगणी लुटुपुटू टोळ्या पुन्हालाख लाखोल्या जरी एकमेका वाहिल्या


गाठण्या सत्ताशिखर बांधती मोळ्या पुन्हाधूळ ज्यांची मस्तकी धारली ते मातले


घालवत नाही, मना, स्वप्नरांगोळ्या पुन्हाराजकारण खेळ हा कुंटणींचा चालला


पुनरपी ढळले पदर, उतरल्या चोळ्या पुन्हामोठमोठे मार्ग पण वाटमारी टोलची


रे खिशा, वाटा बर्‍या त्याच चिंचोळ्या पुन्हादीन-दुबळे गांजले; आग पोटी पेटली


भाजती नेते, पहा, त्यावरी पोळ्या पुन्हानेहमी आश्वासनी अडकतो अलगद अम्ही


आपला देती बळी मक्षिका कोळ्या पुन्हाकैफ धर्माचा नुरे, ना निधर्माची नशा


ह्यापुढे आणू नका त्या अफूगोळ्या पुन्हापाच वर्षे पोटभर खूप लोणी लाटले


जोगव्यासाठी पुढे, 'भृंग', का झोळ्या पुन्हा?

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home