Blogger Template by Blogcrowds.

नाही कशाला सर विषाची 

घ्यावी परीक्षा तर विषाचीजीवन जरा मंथीन, म्हणतो 


चव सांग मजला, हर, विषाचीनवखा नको समजूस, साकी 


रिचवीन मी घागर विषाची   आयुष्य हे धुंदीत गेले 


(जगण्यात पडली भर विषाची)  बोलायचो मी गोड पूर्वी 


आली दया बेघर विषाची  अवहेलनेला झेलल्यावर 


पर्वा कुणा चिल्लर विषाची?  दु:खाहुनीही वेदनामय 


सांत्वनरुपी फुंकर विषाची मरुनी न सॉक्रॅटीस मेला


ही हार मातब्बर विषाची      

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home