Blogger Template by Blogcrowds.

सूर्यासमोर करता धिक्कार काजव्यांचा

मानाल घन तमी पण उपकार काजव्यांचारात्री उरास घेता भाड्यावरी कवडसे


दिवसा उजाड असतो बाजार काजव्यांचाधग तापल्या घराची होते असह्य तेव्हा


शीतल प्रकाश भावे गुलजार काजव्यांचात्यांच्या प्रकाशण्याचा कसला उदात्त हेतू?


लुकलुक करीत चाले शृंगार काजव्यांचागरजेल तोफ तेव्हा विझतील प्राणज्योती


खिंडीत होत पावन निर्धार काजव्यांचाअस्ताचलास गेले तेजोनिधी नृसिंह


दिल्लीत आज भरतो दरबार काजव्यांचाहा र्‍हास की विवशता सामान्य माणसांची?


सोडून सूर्य करती सत्कार काजव्यांचा 

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home