Blogger Template by Blogcrowds.

मायना लिहिला, पुढे सुचले न काही

"प्रिय" म्हणाल्यावर पुढे उरले न काहीहात मी धरला कसा, कळले न काही


वागते तीही जणू घडले न काहीसर्व काही स्पष्ट लिहिणे शक्य नव्हते


अन्‌ तिला कोड्यातले कळले न काहीखूप केले यत्न मी माझ्या परीने


भाळिच्या लेखातले टळले न काहीबोलले सारे भल्यासाठीच माझ्या


सर्व कळले पण मला वळले न काही

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home