Blogger Template by Blogcrowds.

फार काळ कवटाळले उराशी,
पण आता
जुने मोडीत काढुया.

काही मुळात चुकीचे होते;
काही कालबाह्य झाले;
काही वेळखाऊ,
आजच्या गतिमान जीवनाशी विसंगत;
आणि बरेच अव्यवहार्य.
तेच-नीती, तत्त्वे, मूल्ये, नाती वगैरे.

काही भाग चांगला असेलही
पण वेळ कोणाला आहे
निवडत बसायला?
नीर-क्षीर विवेक "म्हणजे रे काय भाऊ?"
फार ताप असतो तो डोक्याला
विचार-बिचार करावा लागतो
"टेन्शन कायको लेनेका?"
त्यापेक्षा घाऊकपणे
जुने मोडीत काढुया.

बाहेरून सर्व चकचकीत नवे आणू,
रुजवू
मातीत, मनांत.
छान फोफावेल,
काँ
ग्रेस गवताप्रमाणे...

व्यवस्था खुली झालीच आहे
अर्थो वा निरर्थो वा अनर्थो वा
तेव्हा, नव्यासाठी जागा करुया,
जुने मोडीत काढुया.

केशवसुत, झाले ना तुमच्या मनासारखे?

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home