Blogger Template by Blogcrowds.

मधुबाला

मूळ हिंदी कवी : हरिवंश राय ’बच्चन’

भावानुवाद : मिलिंद


मधुबाला - २
मधुशाला-मालक


मूळ हिंदी कविता

भावानुवाद

१.
मैं ही मधुशाला का मालिक,
मैं ही मालिक-मधुशाला हूँ !
मधुपात्र, सुरा, साकी लाया,
प्याली बाँकी-बाँकी लाया,
मदिरालय की झाँकी लाया,
मधुपान करानेवाला हूँ ।
मैं ही मालिक-मधुशाला हूँ !
१.
ह्या मधुशालेचा मालक मी,
मी मधुशाला-मालक आहे !
मधुघट, साकी, सुरा आणले,
पेले शोभीवंत आणले,
मद्यगृहाला रूप आणले,
मधुपान करविणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
२.
आ देखो मेरी मधुशाला,
साकीबालाओं की माला,
मधुमय प्याली, मधुमय प्याला,
मैं इसे सजानेवाला हूँ ।
मैं ही मालिक-मधुशाला हूँ !
२.
येऊन पहा मम मधुशाला,
साकीबालांची अन्‌ माला,
मधुमय सुरई, मधुमय प्याला,
मी हिला सजविणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
३.
जब ये मधु पी-पीकर छलकें,
देखो इनकी पुलकित पलकें,
कल कंधों पर चंचल अलकें,
मैं देख जिन्हें मतवाला हूँ ।
मैं ही मालिक-मधुशाला हूँ !
३.
सांडती मधु त्या पिउनी, पहा,
त्यांच्या पुलकित नजरेस पहा,
स्कंधांवर चंचल बटा पहा,
धुंद त्यांस बघणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
४.
इनके मदिराभ अधर देखो,
मृदु कर, कमनीय कमर देखो,
कटि-किंकिण, पद-घूँघर देखो,
मैं मन को हरनेवाला हूँ ।
मैं ही मालिक-मधुशाला हूँ !
४.
मधुशोभित त्यांचे अधर पहा,
मृदु कर, कंबर कमनीय पहा,
पद-नूपुर, कटि मेखला पहा,
मी मनास हरणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
५.
सब चली लिए मधुघट देखो,
’झरझर’ लहराते पट देखो,
’झिलमिल’ हिलते घूंघट देखो,
मैं चित्त चुरानेवाला हूँ ।
मैं ही मालिक-मधुशाला हूँ !
५.
मधुघट घेउनि चालल्या पहा,
फडफडती कैसे पदर पहा,
घुंघट झगमग हालती, पहा,
मी चित्त चोरणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
६.
वे देतीं प्याले चूम-चूम,
वे बाँट रहीं मधु घूम-घूम,
वे झुक-झुककर, वे झूम-झूम,
मदमत्त बनानेवाला हूँ ।
मैं ही मालिक-मधुशाला हूँ !
६.
त्या प्याले चुंबुनिया देती,
मधुचे प्याले वाटत फिरती,
गजगती कधी,कधी हरिणगती,
मदमत्त बनविणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
७.
पीनेवाले हैं बड़े-बड़े,
देखो, पीते कुछ खड़े-खड़े,
कुछ बैठ-बैठ, कुछ पड़े-पड़े,
यह सभा जुटानेवाला हूँ ।
मैं ही मालिक-मधुशाला हूँ ! 
७.
नामांकित येथे पीणारे,
कुणी उभ्या-उभ्याही घेणारे,
बसणारे, कुणी पसरणारे,
मी सभा जमविणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
८.
कुछ आते हैं अरमान-भरे,
कुछ जाते हैं एहसान-भरे,
कुछ पीते गर्व-गुमान-भरे,
मन सबका रखनेवाला हूँ ।
मैं ही मालिक-मधुशाला हूँ !
८.
लालसा कुणी घेउन येती,
उपकार कुणी घेउन जाती,
अन्‌ कुणी आढ्यतेने पीती,
सर्वां तोषविणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
९.
अब चिंताओं का भार कहाँ,
अब क्रूर-कठिन संसार कहाँ,
अब कुसमय का अधिकार कहाँ,
भय-शोक भुलानेवाला हूँ ।
मैं ही मालिक-मधुशाला हूँ !
९.
आता चिंतांचा भार नसे,
ह्या क्रूर जगाचा मार नसे,
काळाचाही अधिकार नसे,
मी भय विसरविणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
१०.
अब ज्ञान कहाँ, अज्ञान कहाँ,
अब पद-पदवी का ध्यान कहाँ,
अब जाति-वंश अभिमान कहाँ,
सम भाव बनानेवाला हूँ ।
मैं ही मालिक-मधुशाला हूँ !
१०.
आता अज्ञान नि ज्ञान कुठे,
पद-पदवीचेही भान कुठे,
वंश-जातिचा अभिमान कुठे,
समभाव निर्मिणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
११.
हो मस्त जिसे होना, आए,
जितने चाहे साथी लाए,
जितनी जी चाहे पी जाए,
’बस’ कभी न कहनेवाला हूँ ।
मैं ही मालिक-मधुशाला हूँ ! 
११.
व्हायचे मस्त त्यांनी यावे,
मित्रांना सोबत आणावे,
जेव्हढे हवे तितके प्यावे,
मी ’पुरे’ न म्हणणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
१२.
आओ सब-के-सब साथ चले,
सब एक ख़ाक ही के पुतले,
क्या ऊँच-नीच, क्या बुरे-भले,
मैं स्वागत करनेवाला हूँ ।
मैं ही मालिक-मधुशाला हूँ !
१२.
चालूया साथीने सारे,
मातीचे तर पुतळे सारे,
उच्च-नीच वा सत्‌-खल सारे,
मी स्वागत करणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !
१३.
आओ, आओ, मत शरमाओ,
क्या सोच रहे हो ? बतलाओ,
है दाम नहीं, मत पछताओ,
मैं मुफ़्त लुटानेवाला हूँ ।
मैं ही मालिक-मधुशाला हूँ !
१३.
संकोच सोडुनी या आता,
जे मनात ते सांगा आता,
का चिंता पैशाची करता,
मी मोफत देणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे.
१४.
मैं पूछ-पूछ मदिरा दूँगा,
आशीष-दुआ सबकी लूँगा,
सबको खुश कर मैं खुश हूँगा,
जी खुश कर देनेवाला हूँ ।
मैं ही मालिक-मधुशाला हूँ !
१४.
मी मद्य आग्रहाने देइन,
आशीर्वच सर्वांचे घेइन,
तोषवुन तुम्हाला खुश होइन,
आनंद वाटणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे.
१५.
कटु जीवन में मधुपान करो,
जग के रोदन को गान करो,
मादकता का सम्मान करो,
यह पाठ पढानेवाला हूँ ।
मैं ही मालिक-मधुशाला हूँ !
१५.
कटु जीवनात मधुपान करा,
रुदनास जगाच्या गान करा,
मादकतेचा सन्मान करा ─
हा धडा शिकविणारा आहे.
मी मधुशाला-मालक आहे !

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home