मिटवू तृष्णा, नंतर करुया देवा-धर्माच्या गोषी
Posted by Milind Phanse at Wednesday, September 09, 2009मिटवू तृष्णा, नंतर करुया देवा-धर्माच्या गोष्टी
पेले भिडवत करुया पावन तीर्थप्रसादाच्या गोष्टी
नटुनी-सजुनी साद घालते आहे जग, तू पहा जरा
जीवन भोगुन होण्याआधी का परलोकाच्या गोष्टी ?
कालपावेतो छेडित होती नजरेला देऊन नजर
झुकले डोळे कसे अचानक, का संकोचाच्या गोष्टी ?
तिची पापणी झुकली खाली, मला वाटले प्रेम असे
उघड्या डोळ्यांनी करतो मी स्वप्नरंजनाच्या गोष्टी
कधी तरी मनसोक्त पिऊ द्या रसाळ ओठांचे प्याले
का ’भृंगा’ला रोज सांगता मनोनिग्रहाच्या गोष्टी ?
माझ्या ह्या उर्दू गझलेचा स्वैर अनुवाद.
Labels: ghazal, Marathi ghazal, अनुवाद, गझल, मराठी गझल
2 Comments:
-
- क्रांति said...
10/9/09 8:29 amvaa! khaas gazal!- Kaustubh said...
10/10/09 5:56 pmapratim!
Subscribe to:
Post Comments (Atom)