Blogger Template by Blogcrowds.

संपत नाही प्रवास तोवर चालत जाणे
जगणे म्हणजे उगाच रस्ता तुडवत जाणे

ओंजळ भरणे कधी कधी किरणांनी आणिक
अंधाराचे कधी कवडसे वेचत जाणे

तडजोडींशी पदोपदी रुजवाती करणे
नैतिकतेच्या प्रखर दिव्यांना विझवत जाणे

कसले चिंतन, कशास गप्पा आत्मोन्नतिच्या
देहाच्या मागण्या अधाशी पुरवत जाणे

उपकारांची तसेच अपकारांची देणी
व्याजासोबत, मिलिंद, मुद्दल फेडत जाणे

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home