Blogger Template by Blogcrowds.

सल

सय पौर्णिमेस आहे, सय चांदण्यास आहे
मी एकटा न ज्याच्या सल काळजास आहे

ओल्या अजून जखमा आहेत यौवनाच्या
अन्‌ साथ आठवांची थकल्या वयास आहे

भिजवून ज्या फुलाला दवथेंब धन्य झाले
सुकणे अटळ तयाचे हा दुर्विलास आहे

बंदिस्त त्यास केले पानात मी वहीच्या
कोमेजल्या फुलाचा कवितेस वास आहे

एका करांगुलीने धरसी मिलिंद पर्वत
अन्‌ काव्यटेकड्यांची इतरां मिजास आहे !

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home