Blogger Template by Blogcrowds.

गझल

आग नाही, धूर नाही
राख होणे दूर नाही

घाव केले, खून नाही
हो, तशी ती क्रूर नाही

विरह भोगावा सखीचा
मेळ तिज मंजूर नाही

तागडी दु:खास कसली ?
(एक अश्रू पूर नाही ?)

धडधडे पाहून तुजला
'भृंग' ते हे ऊर नाही

2 Comments:

  1. धोंडोपंत said...
    वा मिलिंद,

    अत्यंत लहान बहरमध्ये सुंदर ग़ज़ल.

    घाव केले, खून नाही
    हो, तशी ती क्रूर नाही....

    क्या बात है ! अप्रतिम.

    आपला,
    (रसिक) धोंडोपंत
    Vidya Bhutkar said...
    Wowwwwwwwwwww...superb. sagalech sher avadale. ha sarvat jast..

    तागडी दु:खास कसली ?
    (एक अश्रू पूर नाही ?)

    pharach chaan...

    -Vidya

Post a Comment



Newer Post Older Post Home