Blogger Template by Blogcrowds.

सांजावली उन्हं, सखे, नयनदीप तेवु दे
निशिगंध होवुनी तुझा धुंद श्वास येउ दे

आरक्त पश्चिमेत तो क्लांत सूर्य मावळे
सवितेस घेउनी उरी सागरास चेतु दे

जाईजुईस वाहिले कितिकदा पदी तुझ्या
ओठांवरी कधीतरी अधरपुष्प ठेवु दे

ये वाजवीत नूपुरे, छुनुन छून छुनुन छुन
गात्रांतली सतारही त्या लयीत छेडु दे

डोळ्यात काजळी निशा, गाल रक्तभारले
भांगात स्वप्न सिंदुरी, रम्य चित्र देखु दे

3 Comments:

  1. Nandan said...
    milind, saanjaveL aaNi aaghaat donhi kavitaa aavaDalyaa. saanjaveL madhe bhaanget chyaa aivaji bhangaat have hote ka?
    Milind Phanse said...
    नंदन,
    अभिप्रायाबद्दल आभारी आहे. तुमचे म्हणणे बरोबर आहे - 'भांगात' असेच हवे होते. चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. त्यानुसार दुरुस्ती केली आहे.
    धोंडोपंत said...
    सुंदर गज़ल. मिलिंद तुझे शब्दवैभव विलक्षण आहे रे.
    अगस्ती

Post a Comment



Newer Post Older Post Home