Blogger Template by Blogcrowds.

नव्हाळी

रात्र ही यावी, सजावी रोज रात्री
हा जिव्हाळा, ही नव्हाळी रोज रात्री

मीलनाची चंदनी छेडून वीणा
श्वास गातो गंधगाणी रोज रात्री

ताल धरता या उरातिल स्पंदनांने
झिंगुनी लय अनुभवावी रोज रात्री

काळरात्री पाहिले जे स्वप्न आपण
पूर्तता त्याची घडावी रोज रात्री

चांदण्यांच्या मंचकी काया अशी ही
का चितेसम धडधडावी रोज रात्री

रोज मातीने नवा आकार घ्यावा
मृण्मयी जन्मास यावी रोज रात्री

4 Comments:

  1. abhijit said...
    ahha ha!!! sundar..

    kaLratr aani Chitesam he shabd kavitela(gajalela) depth aanat aahet.
    Milind said...
    वाह, कविता खूप छान आहे. आशावादी आहे.
    तुम्हाला 'tag' करण्यात आले आहे.
    For details, visit this link.
    धोंडोपंत said...
    सुंदर, अप्रतिम.

    मक्ता तर खासच आहे.

    "मृण्मयी जन्मास यावी रोज रात्री".....

    क्या बात है!

    शुभेच्छा

    ---अगस्ती
    Milind Phanse said...
    @ जीवन जिज्ञासा
    जुन्या काळी असा रिवाज असे की लग्न झाल्यावरही प्रथम एक रात्र वधु-वरास वेगळं ठेवलं जायी.त्या रात्रीस काळरात्र म्हणत.त्या रात्री वेगवेगळे असूनही वधू-वर साहजिकच येणाऱ्या मधुमीलनाच्या स्वप्नांत रंगलेले असतात.त्याचा संदर्भ ह्या ओळींमध्ये आहे.
    आता, काळाच्या ओघात हा रिवाज निदान शहरी भागात तरी पाळला जात असताना दिसत नाही.

Post a Comment



Newer Post Older Post Home