Blogger Template by Blogcrowds.

आहुती

तुझ्या स्वरांचा कसा रुचावा सनातन्यांना बाज नवा
हवे तयांना जुने बोल अन् तुझा गड्या पखवाज नवा

नकोस मांडू मनोगतें वा व्यथा-वेदना यापुढती
रसिकजनांच्या अंगावरती पूर्वग्रहांचा साज नवा

नको रूपकें,अन्योक्ती वा अलंकार, नुमजे त्यांना
नका उभारू कोणी येथे प्रतिभेचा, रे, ताज नवा

भाट हवे दरबारी यांना, लुसलुशीतसे शब्द हवे
तप्त सळीसम कानी घुसतो सत्याचा आवाज नवा

शिकार करण्या माझी जमले पवित्रतेचे पाईक हे
मला पाहुनी इथे जन्मतो रोज एक नाराज नवा

पुन्हा होम शब्दांचा माझ्या मंबाजींनी मांडियला
पुन्हा आहुती माझी मागे दिवाभितांचा याज नवा

1 Comment:

  1. A woman from India said...
    मिलिंद,

    तुमच्या कविता फ़ारंच छान आणि प्रासादिक आहेत. काव्यात एक प्रकारची गेयता आहे, जी आजकाल क्वचितच आढळुन येते.

    -

    संगीता

Post a Comment



Newer Post Older Post Home