Blogger Template by Blogcrowds.

तिला झोंबणार्‍यातला एक आहे 

पकडला न गेल्यामुळे नेक आहेजुनी तीच गाडी, नवा मेक आहे 


पुरुष आजही तोच दिलफेक आहेनवे स्त्री-पुरुष ते, नवे युग, नवे जग


... जुन्या वासनांचाच उद्रेक आहे किती लोक येथे निर्‍या ओढणारे 


इथे देवकीचा कुणी लेक आहे...? बलात्कार होतात दररोज येथे 


समाजातला क्षोभ व्यतिरेक आहे "हवे आणखी काय त्या पीडितेला?


पहा, शासनाने दिला चेक आहे!"पुन्हा घोषणा त्याच, अन्‌ तेच अश्रू 


पुन्हा क्षार जखमांवरी सेक आहे बहरण्यास भयभीत झालीत झाडे


भुकेला इथे 'भृंग' प्रत्येक आहे

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home