Blogger Template by Blogcrowds.

सूर्य वितळला, सागर झाला सोनसळी
 

अजून एका दिवसाची चिरडली अळी ||धृ|| 


तार्‍यांचा घेऊन पदर चमचमते रात


तासाच्या बोलीवर नागिण टाके कात


कुबेर कोणी, कुणी करी सौदा स्वस्तात


किती काजवे रात्रीवर जातात बळी ||१||



उल्कांची ये-जा रात्रीच्या अवकाशी


प्रकाश क्षणभर, अचेत मग बाहूपाशी


रात्रीचा शृंगार मतलबी दगडांशी


दगडांची अन्‌ रात्रीची मग अळीमिळी ||२||



सांजसावळीच्या मोहाला काय म्हणू


दीप स्वत:चे ज्यात पाहतो ओज चिणू


शिंपल्यात काळ्या मोत्याचे बीज जणू


अशाच संयोगे भरते रंगेल खळी ||३||



रात्र चिरायू, चिरंजीव ही काळोखी


नश्वर तारे, नश्वर सूर्याची शेखी


आंतरज्योती एक क्षीण उरली बाकी


विझेल तीही अंधाराच्या वावटळी ||४||

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home