Blogger Template by Blogcrowds.

लागता लोक बोलू खरे
ओघळू लागले चेहरे

ते अधोमुख; नयन लाजरे
ते मुखवटेच होते, बरे

लोकशाहीत देती पहा
खाटकांना मते कोकरे

हा मयत खास होता धनिक
खूप जमले सखे-सोयरे

पापकर्मे अथक कार्यरत
का घडा ना कुणाचा भरे?

मन करपते तहानेमुळे
शुष्क संवेदनांचे झरे

झाकली मूठ तोट्यातली
कोण हल्ली पदर सावरे?

बोलतो फार विक्षिप्त मी
जो न बोले, शहाणा ठरे

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home