Blogger Template by Blogcrowds.

तुझी, माझी, जगाची ही कथा आहे

सुखाचा शोध सर्वांचा वृथा आहेकटाक्षांना चुकवणे शक्य होते पण


जगी घायाळ होण्याची प्रथा आहेकुणावर आळ घेऊ स्वप्नभंगाचा?


सभोवारी स्वकीयांचा जथा आहेमनीषांनी कसे चौखूर उधळावे?


सवय चिखलात रुतण्याची रथा आहेपुराणातील वांगी शोभते तेथे


खलांची हार ही भाकडकथा आहेतुझे सौभाग्य मज तिसरा नसे डोळा


उरी माझ्या तुझा शर, मन्मथा, आहेअढळ विश्वास आहे, 'भृंग', प्रेमावर


परी नशिबावरी थोडी तथा आहे

1 Comment:

Post a CommentNewer Post Older Post Home