Blogger Template by Blogcrowds.

क्षितिजावरती नजर ठरावी असे न उरले काही 

सुर्यास्ताविण वाट बघावी असे न उरले काही पाणी सुकले, घाट भंगले, अन्‌ वठला औदुंबर 


नदीकडे पाउले वळावी असे न उरले काही सवय आरशात पाहण्याची का जाता जाईना 


पडेल ज्याचा ठसा प्रभावी असे न उरले काही घटने-घटनेनंतर येते शिळे तेच ते धृवपद 


ताल चुकावा, लय उसवावी असे न उरले काही तीच माणसे, त्याच भावना, प्रतारणा, वंचना 


मिलिंद, ज्यावर गझल लिहावी असे न उरले काही

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home