Blogger Template by Blogcrowds.

बरळ

इतके कुणी कुणाच्या जावे जवळ कशाला

लगटून वार करण्या द्यावेच बळ कशाला


आयुष्य भोगण्याची संधी पुन्हा न येते

ही अर्थ शोधण्याची ढवळाढवळ कशाला


मातीत चाक रुतणे चुकते इथे कुणाला

प्रारब्ध माणसाचे ठरते अटळ कशालानीती म्हणून काही उरले न औषधाला

मी अन्यथा कुणावर ओकू गरळ कशालाउल्केसमान सारे खातात रोज माती

मी एकटाच येथे राहू अढळ कशालाकोणी म्हणोत काही, बसणार स्वस्थ आता

आकाश फाटल्यावर लावू ठिगळ कशालासांगेन अर्जुनाला उपयुक्त चार गोष्टी

समरी, मिलिंद, मिथ्या बोलू बरळ कशाला 

1 Comment:

Post a CommentNewer Post Older Post Home