Blogger Template by Blogcrowds.

रोषणाई

ही कशाची रोषणाई ?
पेटले हिंदू-इसाई

मौलवी, पाद्री नि पंडित
आंधळे सारे कसाई

एक माझा मार्ग साचा
ही मनाची रोगराई

कवचकुंडल झापडांची
अन् विचारांना मनाई

मंदिराबाहेर चोखा
गाढ निजलेली विठाई

काल होती मोगलाई
आज उत्तर-पेशवाई...


ही गझल श्री.प्रमोद देव ह्यांनी चाल लावून गायली आहे. त्यांचे गायन ऐकायचे असल्यास खालील प्लेयरच्या '।>' बटणावर टिचकी मारा.

Get this widget | Track details |

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home