Blogger Template by Blogcrowds.

राहिले नाहीत का साकेत बाकी ?
आत्मघाती खूपसे रांगेत बाकी

जन्नती नाही कुमारींचा तुटवडा
अप्सरा स्वर्गातल्या बागेत बाकी

ये मुहाजिद, हो शहिद, अन्‌ गाठ जन्नत
कापण्याला काफिरांचे शेत बाकी

मांडलिक असेणच नशिबी भारताच्या
मानसिंगाचे असावे रेत बाकी

खंत का विझल्या जरी साऱ्या मशाली
काळजी नाही, चिता आहेत बाकी

हात आखडता कशाला पाप करता ?
खूप पाणी आजही गंगेत बाकी !

चार विकले, दोन फुटले, गणित चाले
खासदारांचा कळप पागेत बाकी

मेघ छप्पर, भिंत वारा, बाज पृथ्वी
हिंददेशी ना कुणी अनिकेत बाकी

ये यमा, शास्त्रार्थ करुया दोन घटका
'भृंग' मेला, राहिला नचिकेत बाकी

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home