Blogger Template by Blogcrowds.

ही कशाची रोषणाई ?
पेटले हिंदू-इसाई

मौलवी, पाद्री नि पंडित
आंधळे सारे कसाई

एक माझा मार्ग साचा
ही मनाची रोगराई

कवचकुंडल झापडांची
अन् विचारांना मनाई

मंदिराबाहेर चोखा
गाढ निजलेली विठाई

काल होती मोगलाई
आज उत्तर-पेशवाई...


ही गझल श्री.प्रमोद देव ह्यांनी चाल लावून गायली आहे. त्यांचे गायन ऐकायचे असल्यास खालील प्लेयरच्या '।>' बटणावर टिचकी मारा.

Get this widget | Track details |

माझी विसावा ही गझल श्री.प्रमोद देव ह्यांनी स्वत: चाल लावून गायली आहे. मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. ज्यांना ऐकायची असेल त्यांच्यासाठी त्याचे विजेट खाली आहे.


Get this widget | Track details |

राहिले नाहीत का साकेत बाकी ?
आत्मघाती खूपसे रांगेत बाकी

जन्नती नाही कुमारींचा तुटवडा
अप्सरा स्वर्गातल्या बागेत बाकी

ये मुहाजिद, हो शहिद, अन्‌ गाठ जन्नत
कापण्याला काफिरांचे शेत बाकी

मांडलिक असेणच नशिबी भारताच्या
मानसिंगाचे असावे रेत बाकी

खंत का विझल्या जरी साऱ्या मशाली
काळजी नाही, चिता आहेत बाकी

हात आखडता कशाला पाप करता ?
खूप पाणी आजही गंगेत बाकी !

चार विकले, दोन फुटले, गणित चाले
खासदारांचा कळप पागेत बाकी

मेघ छप्पर, भिंत वारा, बाज पृथ्वी
हिंददेशी ना कुणी अनिकेत बाकी

ये यमा, शास्त्रार्थ करुया दोन घटका
'भृंग' मेला, राहिला नचिकेत बाकी

Newer Posts Older Posts Home